*रामपुऱ्यातील टप्पा क्र. 2. मध्ये अनिधिकारपणे राहऱ्यांना हाकला..वंचितांना खोल्या द्या.. आदिवासी एकलव्य सेनेचे एकनाथ पवार यांची मागणी*
चोपडा दि. 30 ( प्रतिनिधी)येथील नगरपरिषद हद्दीतील IHSDP टप्पा. २.रामपुरा भागातील घरामधील लाभार्थी सोडून अन्य बिगर लाभार्थी अनाधिकारपणे खोल्यात राहत असल्याने त्या लोकांना तात्काळ त्या खोल्यांमधुन काढून इतर गरजु लाभार्थ्यांना खोल्या देण्यात याव्यात अशी जोरदार मागणी
आदिवासी एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ खंडु पवार ,भिल यांनी केली आहे..
श्री. पवार हे रामपुरा भागातील कायम रहिवासी असून अशिक्षित आहे. पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात, त्यांनी नगरपरिषद चोपडा यांना अनेक माहिती अधिकार अंतर्गत अर्ज देवुन IHSDP टप्पा नं. २.यांची माहिती मिळवली व त्यासाठी त्यांना अपील देखील करावे लागल्यानंतर , नगरपरिषदे मार्फत सर्व्हे होऊन टप्पा क्र. २ ह्या IHSDP योजने अंतर्गत बांधलेल्या घराधील मुळ लाभार्थी व्यतिरिक्त, भाडेकरू व गहाणदार तसेच इतर लोक, ज्यांना सदर खोल्या लाभार्थी म्हणून देण्यात आल्या नाहीत असे लोक त्यांच्या परिवारासह रहात असल्याबाबत सर्व्ह नंतर कागदोपत्री सिद्ध झाले.वास्तविक पाहता लाभार्थ्यांने सदर योजने अंतर्गत मिळालेल्या खोल्या ह्या अहस्तांतरणीय आहेत. असे असतांना त्याचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले व खरे वंचित लोक आजही झोपड्यांमध्ये, काही उघड्यावर वास्तव्य करून रहात आहेत. नगरपरिषदेने सर्व्हे करुन, त्या खटल्यामध्ये अनाधिकारपणे रहात असलेले, भाडेकरी , गहाणदार, इतर नातलग (लाभार्थी व्यतिरिक्त) यांचेकडून सदर खोल्या राजरोसपणे सुरू आहे हा सदरचा प्रकार थांबवून
इतर वंचित लोकांना जे झोपडीत किंवा उघड्या रहात आहेत त्यांना खोल्या देण्यात याव्यात अशी विनंती एकनाथ पवार यांनी केली आहे .