सार्वजनिक विद्यालय अडावद येथे विविध नवोत्क्रम राबवून संविधान दिन साजरा
अडावद ता २७ (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक विद्यालय अडावद येथे संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून संविधान दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम , पर्यवेक्षक एम जी पाटील आणि सर्व शिक्षकेतर बंधू भगिनींनी बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक जीवन शिसोदे संविधान दिनानिमित्त मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांविषयी सचिन पाटील सरांनी माहिती दिली व सर्व शहिदांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर संविधान दिनानिमित्त पाठ्यपुस्तकातील संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले . त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विविध वर्गातील 30 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यांचे ६ गट पाडून त्यांना संविधानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. पैकी प्रथम क्रमांक मिळवलेल्या गटाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रश्नमंजुषा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कदम यांनी अतिशय मनोरंजक रीत्त्या घेतली त्यामुळे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपल्यानंतर चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, संविधान सुलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यालाही विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. विषयाशी निगडी अनेक प्रकारचे पोस्टर विद्यार्थ्यांनी तयार केले होते. पोस्टर्स स्पर्धेनंतर मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी संविधानावर आधारित पथनाट्य सादर केले, या पथनाट्याने विद्यार्थ्यांचे आणि सर्व गुरुजनांचे लक्ष वेधले.विद्यालयात तयार करण्यात आलेल्या संविधान दिन सेल्फी पॉईंट वर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांसहित सेल्फी घेण्यात हिरीरीने सहभाग घेतला. दिवसभर सुरू असलेल्या संविधान दिनानिमित्त प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी उत्कृष्टपणे सहभाग घेताना दिसून आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचीन पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात संविधान दिना निमित्त प्रसंगी मुख्याध्यापक अशोक कदम पर्यवेक्षक एम जी पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर
