वाळकी शेंदणी सरपंच प्रकरणात अपर विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय ! अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती; अपीलार्थींना अंतरिम दिलासा
चोपडादि.२८( प्रतिनिधी)वाळकी शेंदणी (ता. चोपडा, जि. जळगाव) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासंदर्भाच्या वादात अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश पारित केला असून, अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी पारित केलेल्या आदेशाला स्थगिती दिल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
*तक्रारदार श्रीमती दिपाली दिपक पाटील, रा. वाळकी शेंदणी* यांनी केलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 च्या 31 व 10( 1- अ) अन्वये दाखल ग्रामपंचायत विवाद अर्जामध्ये अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2026 रोजी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपीलार्थी *श्रीमती रुख्माबाई शामराव साळुंके (रुख्माबाई वसंत कोळी)* यांनी अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपीलासोबत आदेशाला स्थगिती देण्याबाबत स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तक्रारदार *दिपाली दिपक पाटील* यांच्या बाजूने अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश होता. मात्र अपीलार्थींच्या बाजूने सादर करण्यात आलेले मुद्दे, अभिलेख व प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन अपर विभागीय आयुक्त, नाशिक यांनी अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दिनांक 18/11/2026 रोजीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
अॅड. वसंत भोलाणकर* यांच्या प्रभावी कायदेशीर बाजू मांडण्याच्या पार्श्वभूमीवर, मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुद्द्यावर प्रथमदर्शनी अपील ग्राह्य धरून प्रकरणात अंतरिम स्थगितीचा आदेश पारित झाला आहे. यामुळे अपीलार्थींना महत्त्वपूर्ण न्यायालयीन दिलासा मिळाला असून रुख्माबाई साळुंके सरपंच पदी कायम झाल्या आहेत.
अपर विभागीय आयुक्तांच्या या अंतरिम आदेशामुळे वाळकी शेंदणीग्रामपंचायत सरपंच पदाच्या वादात पुढील न्यायालयीन प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळाल्याने आता पुढील सुनावणी व अंतिम निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अपीलार्थीतर्फे *अॅड. वसंत भोलाणकर* यांनी कामकाज पाहिले.
