आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी करणाऱ्यावर पोलीसात गुन्हा
चोपडा दि.२७(प्रतिनिधी): चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची जनमानसात असलेली आदरातिथ्य प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने व जनतेची दिशाभूल व्हावी विकृत विचाराने इंस्टाग्राम आयडीवरुन सोशल मीडियाद्वारे बदनामी करणाऱ्या इसमाविरूध्द शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून ताब्यात घेऊन नोटीस बजावण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील गावागावात होत असलेल्या विकास कामांचे शिल्पकार आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उत्कृष्ट कामांचा गवगवा शेवटच्या गावातील शेवटच्या गल्लीत शेवटच्या कोपऱ्यापर्यंत होत आहे.त्यामुळे तळागाळातील जनमानसाचे मनात आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन आमदार महोदयांचे प्रती स्वच्छ व आदरातिथ्य प्रतिमा तयार झाली आहे. या गोष्टीचे पोटशूळ उठतं माचला येथील तरुण विकास ईश्वर निकम याने बदनामीस्तव आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची जनमानसात असलेली वैयक्तिक प्रतिमा घाणेरड्या पध्दतीने मलीन करण्याच्या उद्देशाने गैर तक्रारदार यांच्या इंस्टाग्रामchodapoliticalcomedy अकाउंटवरून जनतेची दिशाभूल व बदनामी करणाऱ्या पोस्ट वायरल केल्या.सदरील पोस्ट दि.९/१०/२०२६ते २६/११/२०२६ या कालावधीत वारंवार सोशिअल मिडिया वरून व्हायरल करून बदनामी केली आहे. याबाबत योगेश भास्कर पाटील रा. रामानंद नगर जळगाव यांच्या खबरीवरून आरोपी विकास निकम याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 461/2026, भारतीय न्याय संहिता कलम 296, 356 ( 2 ),351 (2) 352 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून नोटीस बजावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहे.
