विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात करिअर करावे : पंकज व्यवहारे

 विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात करिअर करावे : पंकज व्यवहारे


चोपडा,दि.१७(प्रतिनिधी )---- विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला किंवा पालकांच्या अवास्तव अपेक्षांना बळी न पडता आपल्या आवडत्या आणि कलागुणांना वाव देणाऱ्या क्षेत्रातच करिअर करावे, असे प्रतिपादन रोटरीयन पंकज व्यवहारे यांनी केले.

धानोरा येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये रोटरी क्लब जळगाव आणि आरसीसी क्लब धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प' गुंफताना ते बोलत होते. या व्याख्यानात त्यांनी 'करिअर आणि अवास्तव अपेक्षा' या विषयावर विद्यार्थ्यांना अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश कुमार पाटील होते.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून रोटरीयन सुभाष अंमळनेरकर, रोटरीयन सुबोध सराफ, विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, आरसीसी अध्यक्ष संदीप गुजर, पर्यवेक्षक एल.डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही.डी.कोष्टी,एस.डी.सोनवणे, सी.आर.चौधरी, एस.सी.पाटील, श्रीमती रेखा महाजन, सौ.पूनम पाटील, दीपक पाटील यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

       व्याख्यानात पुढे बोलताना पंकज व्यवहारे म्हणाले की, आजच्या काळात पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण येतो. करिअर निवडताना स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा मेळ घालणे गरजेचे आहे.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कल्याणी महाजन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार हिंदी विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांनी मानले. व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने