विवेकानंद इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु. हर्षाली पाटील हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 विवेकानंद इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु. हर्षाली पाटील हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चोपडा दि.१७(प्रतिनिधी)येथील विवेकानंद इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु. हर्षाली पाटील हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे 

 महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी *कु. हर्षाली रवींद्र पाटील* हिने शासकीय क्रीडा स्पर्धेतील कॅरम प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या यशात मानाची भर घातली आहे.   तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागस्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेत (U-19) कु. हर्षाली रवींद्र पाटील हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे, कौशल्याचे आणि जिद्दीचे दर्शन घडवले. या स्पर्धेत तिने विभागस्तरावर सहावा क्रमांक पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तिच्या या यशाच्या जोरावर तिची आगामी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग येथे निवड झाली आहे.

हर्षालीने मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि क्रीडाक्षेत्रातील समर्पणाचे फलित आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

कु. हर्षाली रवींद्र पाटील हिने संपादन केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच सर्व विश्वस्त तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका व

 उपमुख्याध्यापिका, महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापक, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही हर्षालीच्या यशाचे कौतुक करून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.हर्षालीच्या या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक आदरणीय आर. पी. आल्हाट सर आणि श्री. विजय पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने