चोपडा महाविद्यालयात मैदानी स्पर्धांचे यशस्वी आयोजन
चोपडा दि.३(प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत , महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय,आणि
कै. म. तु. पाटील, महाविद्यालय, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धांचे (पुरुष व महिला ) यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेला संस्थेचे अध्यक्ष एड. संदीप सुरेश पाटील तसेच सचिव माननीय ताईसाहेब डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पवन देसले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.पोलिस निरीक्षक श्री. पवन देसले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की , क्रीडा क्षेत्रामुळे खेळाडू आपले करिअरच घडवू शकत नाही तर शारीरिक मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या ही ते विकसित होतात आणि क्रीडा क्षेत्रांमुळे व्यक्ती आरोग्य संपन्न, निर्णय क्षमतेने परिपूर्ण होतो तसेच त्यांनी त्यांच्या खेळाडू दशेतले काही अनुभव त्यांनी खेळाडूं समोर व्यक्त केले. त्याचप्रमाणे डॉ. दिनेश पाटील यांनीही खेळाडूंना जास्तीत जास्त संख्येने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ संध्या सोनवणे यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खेळामध्ये पारदर्शकता आणून खेळाचे कौशल्य दाखवावे आणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. या मैदानी स्पर्धांचे आयोजन एरंडोल विभाग क्रीडा समितीचे अध्यक्ष, मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले तसेच सचिव डॉ. देवदत्त पाटील एरंडोल विभाग क्रीडा समिती, द्वारा -कै. म. तु. पाटील महाविद्यालय, मारवड यांच्या अंतर्गत करण्यात आले. या स्पर्धांना विविध महाविद्यालयातुन आलेले क्रीडा संचालक डॉ. शैलेश पाटील, डॉ. दिनेश तांदळे, डॉ. विजय पाटील, डॉ. एच. एन. सरदार, डॉ.संजय भावसार, डॉ. के.जे वाघ, डॉ. दीपक पाटील, डॉ.सचिन पाटील, खुशाल देशमुख, श्री. मुकुंद शिरसाठ, गायकवाड सर यांनी स्पर्धा पाडण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले तसेच या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए.वाघ, एस. एम. पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धांना संस्थेचे अध्यक्ष एड. संदीप पाटील, सचिव ताईसाहेब पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत एरंडोल विभागातुन बहुसंख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धांचे सूत्रसंचालन व आयोजन क्रीडा संचालक डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले. जिमखाना विभागाचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील, श्री. आर. एच. पाटील श्री. एस. एच. बाविस्कर यांनी सहकार्य केले
