यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे पुरस्काराबद्दल चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार
चोपडा ,दि.१७(प्रतिनिधी): ज्येष्ठ नागरिक संघास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारोह नुकताच पार पडला.
यावेळी अध्यक्ष श्री. जयदेव देशमुख, उपाध्यक्ष श्री. जिजाबराव नेरपगारे, व सचिव श्री. विलास पाटील यांचा सत्कार डि. टी. चौधरी , माजी महाराष्ट्र राज्याचे फेस्काम अध्यक्ष, श्री.जगतराव पाटील माजी प्रादेशिक धुळे विद्यमान प्रादेशिक धुळेचे अध्यक्ष श्री. अरुण कुमार माळी,जळगांव जिल्हा समन्वय अध्यक्ष प्रा. श्री. एस.बी.महाजन , तसेच चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अरुण धांडे यांनी केला.
याप्रसंगी कोषाध्यक्ष श्री भालचंद्र साळुंखे, माजी अध्यक्ष श्री विजय करोडपती सर, श्री. एम. डब्ल्यू. पाटील सर, श्री. गोकुळ पाटील, श्री. प्रकाश चौधरी, श्री. संजय बजाज, प्रा. श्री. एस. एम. पाटील सर, श्री आधार माळी, श्री. रमेश देशमुख, महिला संघाचे अध्यक्षा सौ. नलिनी नलिनीताई देशमुख, सचिव श्रीमती हिरा जाधव, महिला संघाच्या अध्यक्षा सौ. मीनाताई पाटील, सौ. पाटील, सौ. प्रमिला देशमुख, उपस्थित होते. तसेच तालुक्यातील जुने संघाचे ८ अध्यक्ष, व नवीन संघ १२ अशा २० संघाचे अध्यक्षांचे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
