आज चोपड्यात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम,वाचकांसाठी ग्रंथ संपदा खुली

 

आज चोपड्यात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम,वाचकांसाठी ग्रंथ संपदा खुली

चोपडा,दि.१५(प्रतिनिधी)- तालुक्यातील शतकोत्तर वाटचाल करणारे नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) व अखिल भारतीय साहित्य परिषद अर्थात साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने दि.१५ अक्टोबर रोजी दरवर्षी साजरा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा नम्रता पाटील राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून पीपल्स बॅक चेअरमन चंद्रहास गुजराथी,नगरसेवक हितेंद्र देशमुख उपस्थित राहणार आहेत.तर वक्ते म्हणून साहित्यिक पौर्णिमा हुंडीवाले,सामाजिक कार्यकर्ते  सौरभ श्रीकांत नेवे हजर असतील.कार्यक्रम आज दि. १५ रोजी सांय.५ वाजता अमरचंद सभागृहात संपन्न होणार आहे. यावेळी वाचक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी,कार्यवाह गोविंद गुजराथी,साहित्य भारतीचे अध्यक्ष अशोक सोमाणी,सचिव प्रभाकर महाजन यांनी केले आहे.

*वाचकांसाठी ग्रंथ संपदा खुली*

दि.15ऑक्टोबर राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त नगर वाचन मंदिरा तर्फे सकाळी 9ते सायंकाळी7पर्यंत वाचनालयातील सर्व 36000 ग्रंथ संपदा वाचकांना वाचना साठी खुले ठेवण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने