चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात 'संशोधन पद्धती'वर यशस्वी कार्यशाळा संपन्न
चोपडा,दि.१८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील संशोधन समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि विज्ञान मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “संशोधन पद्धती” या विषयावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची योग्य दिशा, संधी आणि नवनवीन दृष्टिकोन मिळावा ही यामागील भूमिका होती.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड .संदीप सुरेश पाटील यांनी सर्व विभागाचे अभिनंदन करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील ह्या उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच पारोळा येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा . डॉ.गुणवंत सोनवणे, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक तसेच साऊथ कोरिया येथील एस.एम.विद्यापीठाचे डॉ. दिनेश ठाकूर आणि एनएसटी विद्यापीठ दिल्ली येथील डॉ. स्वनिल सोनवणे त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.बी. एम. सपकाळ, उपप्राचार्य प्रा. डॉ .के. एन. सोनवणे, प्रा. ए. बी. सूर्यवंशी आणि समन्वयक डॉ. एस. ए. वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन समिती प्रमुख प्रा. डॉ.पी. के. लभाणे यांनी केले.
या कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये नामवंत वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात प्रा. गुणवंत सोनवणे यांनी 'संशोधन कौशल्य विकास' या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना संशोधन संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या.दुसऱ्या सत्रात डॉ. दिनेश ठाकूर यांनी साऊथ कोरियाहून ऑनलाइन जोडले जात 'संशोधनातील आव्हाने आणि उपाय' या विषयावर विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात डॉ. स्वनिल सोनवणे यांनी 'संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) नैतिक वापर' या आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला.
यावेळी उपप्राचार्य प्रा. बी. एम. सपकाळ यांनीही विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संध्या एम.सोनवणे यांनी संशोधन पद्धती कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. पटले यांनी केले तर आभार विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. डॉ .प्रीती रावतोळे यांनी मानले. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
