घोडगांव येथे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर मॅडम यांची सदिच्छा भेट
चोपडा,दि.२०( प्रतिनिधी ): येथील पोलीस स्टेशन मध्ये आज रोजी जळगाव मुखालयातील पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गप्पा मध्ये त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. या नंतर किशोर दुसाने यांच्याकडे गणपतीची आरती केली व सेन्ह भोजनाचा कार्यक्रम झाला.
सत्काराच्या वेळी घोडगांवचे उपसरपंच किशोर दुसाने.भाजपा जळगाव ओबीसी सेलचे अध्यक्ष पंकज पाटील, घोडगांवचे पोलीस पाटील प्रभाकर सोनवणे(शालीक पारधी) , कुसुंबे चे पोलीस पाटील, संजय पाटील, गलंगीच्या पोलीस पाटील सौ.चारुलता देवराज, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रविण कोळी,सुनिल देवराज, विकास पाटील, प्रदीप पाटील, शिवाजी न्हावी, नाना पवार, महेंद्र कोळी यांच्या सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
