विवेकानंद शाळेत व शिक्षकांच्या घरात विलोभनीय पर्यावरण पूरक गणपती बाप्पा

 विवेकानंद शाळेत व शिक्षकांच्या घरात विलोभनीय पर्यावरण पूरक गणपती बाप्पा 




चोपडा,दि.२० (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी यंदा पर्यावरण पूरक शाडू माती पासून श्री गणेश मूर्ती बनवण्याच्या एकूण आठ कार्यशाळा झाल्या .सत्रासेन येथील आश्रमशाळा,रोटरी क्लब जळगाव,विवेकानंद प्राथमिक विद्यालय विवेकानंद माध्यमिक विद्यालय विवेकानंद इंग्लिश मीडियम विद्यालय अशा ठिकाणी घेत तब्बल सहा हजार प्लस विद्यार्थ्यांना शाडू माती पासून सोप्या पद्धतीने गणपती बाप्पा कसा बनवायचा कसा सजवायचा व रंगवायचा याचे प्रशिक्षण दिले नुसतेच प्रशिक्षण दिले नाही तर स्वतः देखील गेले काही वर्ष ते स्वतःच्या हाताने बनवलेली श्री गणेश मूर्ती स्थापित करतात यावर्षी विवेकानंद विद्यालयात दीड फुटाची व स्वतःच्या घरात एक फुटाची मूर्ती साकारून विधीवत तिची स्थापना केली विद्यालयाचा व सरांचा हा  उपक्रमाचे अनुकरण करत शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी देखील स्वतः तयार केलेली शाडू मातीची मूर्ती स्थापन केली पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेले हे पहिले पाऊल निश्चितच निसर्गासाठी व समाजासाठी उपयुक्त ठरेल सोबत शाळा व घरी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचा फोटो बघावयास मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने