प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील खेळाडूंच जिल्हास्तरीय शासकीय लॉन टेनिस स्पर्धेत घवघवीत यशाची परंपरा कायम
चोपडा दि.२२(प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष 2026,27 च्या शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये जळगाव जिल्हा स्तरीय मुलींच्या लॉन टेनिस खेळ प्रकारात 19 वर्षे वयोगटातील प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील 11th विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी भावना दीपक खैरे व हर्षदा हेमकांत सांगोरे तसेच 12th विज्ञान शाखेतील कल्याणी शरद पाटील व अश्विनी गुरुदास मोरे , यांनी जिल्हास्तरावर विजय मिळवून या खेळाडूंची विभागीय पातळीवर कौतुकास्पद निवड करण्यात आली. या खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,चेअरमन, सचिव, संस्था कार्यकारणी सदस्य,मुख्याध्यापक, समन्वयक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्याकडून कौतुक करण्यात येत असून जिल्हास्तरीय सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .सदर खेळाडू हे नाशिक विभागावर जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
