राष्ट्रीय सनातन सेना भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारीपदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव पांडुरंग शिरसाठ यांची निवड
चोपडा दि.४(प्रतिनिधी)राष्ट्रीय सनातन सेना भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारीपदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव पांडुरंग शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भगवती प्रसाद शुक्ला यांनी ही निवड केली आहे. जिल्ह्यातून प्रथमच संघटनेच्या प्रदेश कार्यकारणीवर जळगाव जिल्ह्याला स्थान मिळाल्याचे बोलले जात आहे.
ही निवड परमपूज्य सच्चिदानंद महाराज व गुरुदेव दंदरौआ महाराजांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय सनातन सेना सेनेचे संघटन व व्यापक काम करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे सनातन धर्माच्या प्रतीक विचारधारा असल्याने जनसामान्यांपर्यंत विशाल कार्य करण्याची भूमिका निवारणाच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे या निवडीची सूचना संघटनेने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, भोपाल प्रशासन, समस्त मीडिया प्रभारी ,राष्ट्रीय संयोजक राष्ट्रीय सेना सनातन भारत तसेच राष्ट्रीय प्रभारी सनातन सेना यांना सुचित करण्यात आले आहे.
संजीव शिरसाठ हे प्रदीर्घ काळापासून गोरगरीब आदिवासी समुदायासाठी व्यापक कार्य करीत असून लोकसेवा संघर्ष समिती, अखिल भारतीय कोळी समाज, अखिल भारतीय कोरी कोळी समाज, चोपडा तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्य पदांवर तसेच आदिवासी क्षेत्रात समाज कार्य करीत आहेत शिवाय प्रदेश पातळीवर त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे . मागील काळात त्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक लोकमतने आदिवासी भागात चांगले कार्य केल्याने पुरस्कारार्थी गौरव केलेला आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे
