धानोरा येथे सतपंथ ज्योत मंदिरात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर उत्साहात ♦️पंचक्रोशीतील चारशेहून अधिक रुग्णांची तपासणी

 धानोरा येथे सतपंथ ज्योत मंदिरात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर उत्साहात

♦️पंचक्रोशीतील चारशेहून अधिक रुग्णांची तपासणी

  धानोरा प्र ता. चोपडा,दि.७(प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथे गांधी तीर्थ जळगाव  रोटरी क्लब जळगाव व सतपंथ मंदिर धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्व प्रकारची आरोग्य तपासणी मध्ये  हिमोग्लोबिन तपासणी  डोळे तपासणी जनरल तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  या  शिबिरात पंचक्रोशीतून सुमारे ४२५ हून अधिक गरजू गोरगरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली.

   याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष हेमंत भंगाळे  मानद सचिव स्वाती ढाके  संवाद सचिव पराग जहांगीरदार  डॉ तुषार फिरके डॉ काजल फिरके विजय जोशी सुबोध सराफ संदीप शर्मा गांधी तीर्थचे सुधीर पाटील  प्रशांत सुर्यवंशी विक्रम आस्वाद  यांच्या मार्गदर्शनात  शिबीराचे नियोजन करण्यात आले होते

  डॉ माधुरी कासट डॉ पवन बजाज  डॉ हर्षदा पाटील  डॉ ज्योती चौधरी डॉ हर्षवर्धन जोशी  डॉ तन्मयी महाले  डॉ कृष्णा गायणे डॉ पुनम शिंदे डॉ अनघा गाभने डॉ  प्रतिभा यावलकर डॉ निरंजन शिंदे बाजीराव पाटील सुमनलाल महाजन  आरसीसी अध्यक्ष संदीप गुजर माजी अध्यक्ष प्रदीप महाजन उपाध्यक्ष वासुदेव महाजन अध्यक्ष गजानन चौधरी  ईश्वर मुखी  महाराज  खुशवंत चौधरी प्रीतम पाटील प्रमोद झवर नवल गुजर  कैलास महाजन धनराज चौधरी विकास महाजन नवल गुजर प्रा  रेखा महाजन  सौ पूनम पाटील   उपस्थित होते


गोरगरीबांसाठी आयोजित शिबिराच्या प्रास्ताविकात ऍड. हेमंत भंगाळे  यांनी गावातील सामाजिक योगदानाचा उल्लेख करुन दरवर्षी गावातील गरजूंसाठी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून हे शिबिर घेतल्याचे स्पष्ट केले


     पंचक्रोशीतील बिडगाव  मोहरद  चिंचोली देवगाव पारगाव  पंचकसह धानोरा परिसरातून आलेल्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून  मोफत औषधि वाटप केले तसेच गरजूंना विनामूल्य चष्मे देण्यात आले  मोफत तपासणी आणि उपचार मिळाल्याने रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. उपस्थित डॉक्टरांनीही उत्साहाने सेवा देत शिबिर यशस्वी केले. सतपंथ ज्योत मंदिराच्या वरील प्रशस्त हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जनरल तपासणी डाॅ उदय चौधरी डाॅ पराग जहागिरदार  डाॅ लिना बडगुजर, डाॅ प्रांजली जयस्वाल डाॅ  अंजली नेवे यांनी तर डोळे तपासणी डाॅ तुषार फिरके डाॅ काजल फिरके  डाॅ  निकुंज गुजराथी डाॅ  अनुपम सिंग डाॅ मृणाल पाटील  डाॅ भाग्यश्री साळवी डाॅ गौरव डॉ दामोदर चौधरी  लक्ष्मण जोशी यांनी तर बालरोगतज्ज्ञ डाॅ  नेहा काबरा व महिलांची कर्करोग तपासणी डाॅ साधना पाटील व डाॅ  चेतना राणे यांनी व दातांची तपासणी डाॅ रोहन बोरोले यांनी केली

नोंदणीचे काम कल्पेश महाजन समृद्धी पाटील  खुशाल पाटील सुयश सुरवाडे  यासह इंटरॅक्ट क्लब सदस्यांनी सहकार्य केलेग्रामस्थांच्या सहकार्याने आणि आरसीसी क्लब व इंटरॅक्ट क्लब यांच्या पुढाकारामुळे शिबिर यशस्वी ठरले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने