डॉ. किरीट सोमय्या यांचा आज जळगाव दौरा; भाजप SIR बैठकीस उपस्थित राहणार

 डॉ. किरीट सोमय्या यांचा आज  जळगाव दौरा; भाजप SIR बैठकीस उपस्थित राहणार



जळगाव दि 19 (प्रतिनिधी) :भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमय्या हे सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी मालेगाव–धुळे–जळगाव दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार तसेच विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) संदर्भातील भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकींना मार्गदर्शन करणार आहेत.
दौऱ्याची सुरुवात सकाळी मुंबईतील नीलम नगर, मुलुंड येथून मालेगावकडे प्रस्थानाने होणार आहे. सकाळी 11.30 वाजता ते मालेगाव अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर दुपारी 12.00 वाजता मालेगाव भाजप कार्यालयात आयोजित भाजप SIR बैठकीत ते सहभागी होऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
यानंतर ते धुळे येथे रवाना होतील. दुपारी 3.00 वाजता धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर 3.45 वाजता धुळे शहर भाजप कार्यालयात आयोजित SIR बैठकीत सहभाग घेऊन मतदार नोंदणी व पुनरावलोकन अभियानाचा आढावा घेतील.
धुळे येथील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉ. सोमय्या हे सायंकाळी 6.30 वाजता जळगाव शहर भाजप कार्यालयात होणाऱ्या भाजप SIR बैठकीस उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील भाजप कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, आगामी मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना देणार आहेत.
बैठकीनंतर ते सायंकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळावरून Alliance Air 9I-602 या विमानाने मुंबईकडे रवाना होणार असून, रात्री 9.20 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे.
डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जळगावमधील SIR बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने