घाडवेल येथे ३४ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात संपन्न
चोपडा,दि.१९ (प्रतिनिधी): चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या घाडवेल (ता. चोपडा) येथील सुमारे ३४ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे, चोपडा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, विकास पाटील, रवी पाटील, अनु ठाकूर, अशोक कोळी, गजानन पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील, संतोष पाटील, उपसरपंच प्रेमचंद पाटील, वसंत पाटील, राजू पाटील यांच्यासह गावातील नागरिक, महिला, युवक, पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी घाडवेल गावातील स्मशानभूमी येथे १० लाख रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या सांत्वन शेडचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच २४ लाख रुपये खर्चातून बांधण्यात आलेल्या दोन नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामांमुळे गावातील शैक्षणिक सुविधा अधिक बळकट होणार असून स्मशानभूमीत नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान मराठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व संपूर्ण कर्मचारीवृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांनी विकासकामांचे स्वागत करत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
