मेलाणेच्या लोकनियुक्त सरपंच लालबाई प्रताप पावरा यांचे निधन

 मेलाणेच्या लोकनियुक्त सरपंच लालबाई प्रताप पावरा यांचे निधन 




चोपडा,दि.२५ (प्रतिनिधी) : तालुक्यातील मेलाणे येथील लोकनियुक्त सरपंच स्व. लालबाई प्रताप पावरा यांचे मंगळवार (दि. 23 जून 2026) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मेलाणे गावावर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्व. लालबाई पावरा या शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने पावरा परिवारासह गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी बुधवार (दि. 24 जून 2026) रोजी मेलाणे येथे शोकमय वातावरणात पार पडला.

त्यांच्या पश्चात पती प्रताप खाज्या पावरा, पुत्र नामसिंग  पावरा, प्रवीण  पावरा, रामसिंग पावरा, सुनिल पावरा, सुना, नातवंडे तसेच समस्त शेवाळे (पावरा) परिवार असा मोठा आप्तपरिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने