वेळोदे ग्रामपंचायत कार्यालयात एकल महिला दिवस साजरा
चोपडा,दि.२५(प्रतिनिधी) महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या परिपत्रकानुसार 23 जून 2026 रोजी सर्व ग्रामपंचायत मध्ये एकल महिला दिवस साजरा करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या पत्रांन्वय वेळोदे ग्रामपंचायत कार्यालयात एकल महिला दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशासकीय अधिकारी सरपंच सुंदर बाई यांनी भूषवले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील 80 एकल महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या सर्व महिलांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले , कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ पुष्पवती मोरे यांनी मार्गदर्शन केले, त्यांनी एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक दिली जावी याबाबत मार्गदर्शन केले व एकल महिला स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम कशा होतील याबाबत देखील मार्गदर्शन केले. तसेच प्रशासकीय सदस्य श्री संजय बोरसे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगून एकल महिलांसाठी स्वयंरोजगाराबाबत माहिती दिली, तसेच बचत गटांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत माहिती दिली ज्या एकल महिला बचत गटात सामील नसतील त्यांना स्वतंत्र एकल महिला बचत गट स्थापनेबाबत मार्गदर्शन केले. शासकीय कागदपत्रांच्या अडचणींबाबत आपले सरकार पोर्टल बाबत मार्गदर्शन केले व एकल महिलांना रूढी परंपरेनुसार अवमानित केले जाऊ नये, यासाठी सभेत ठराव करण्यात आला. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पवार यांनी देखील बचत गटांच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या. ग्रामपंचायतचे वतीने एकल महिलांना चहा व नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसेवक श्री राकेश देवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर कोळी ,शरद बोरसे, प्रफुल्ल थोरात यांचे सहकार्य लाभले,
