खैरकुंडी आदिवासी दुर्गम भागात आरोग्य शिबिर

 खैरकुंडी आदिवासी दुर्गम भागात आरोग्य शिबिर 


चोपडा,दि.३(प्रतिनिधी)-  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी ,वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मराठे व डॉ.सुनील बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ.केंद्र वैजापूर अंतर्गत उपकेंद्र देवझिरी येथील अंत्यत अतिदुर्गम अशा खैरकुंडी पाड्यात विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे  मान्सूनपूर्व कार्यक्रमांतर्गत कीटकजन्य आजाराविषयी सर्वेक्षण,सर्व गरोदर मातांची तसेच सर्व लहान बालकांची तपासणी डॉ.सुनील बारेला यांनी केली, एन सी डी कॅम्प घेण्यात आला.पाणी पुरवठा स्रोत तपासणी, माझं गाव आरोग्य संपन्न गाव,ग्राम आरोग्य पोषण दिवस संदर्भात सर्व किरकोळ आजारी रुग्णांवर उपचार केले.लसीकरण सत्रात ५ गरोदर मातांच्या रक्तदाब ,रक्तातील साखर, हिमोग्लोबीन चाचण्या करून त्यांना धनुर्वात,घटसर्प आदी लस देण्यात आली.लहान बालकांना वयोगटाप्रमाणे लसीकरण करण्यात आले.एन सी डी कॅम्पमध्ये एकूण ५२  लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.  

    वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बारेला यांनी गरोदर मातांना माहेरघर योजनेबद्दल सविस्तर माहितीयुक्त मार्गदर्शन केले,त्या अनुषंगाने आरोग्य केंद्रात अगोदर भरती होण्यासाठी सल्ला दिला.समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद राठोड यांनी पावसाळ्यात उकळून गार केलेले पाणी पिण्यास सूचना दिल्यात व त्यांचे हस्ते लाभार्थ्यांना ओ आर एस पाकिटांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम शिबिर यशस्वितेसाठी जपायगो टीमचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील,आरोग्य सहाय्यक प्रशांत बोरसे,आरोग्य सेविका निशा डोंगरे,गट प्रवर्तक अंजना कोळी,आशा सेविका छमी बारेला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने