एस टी च्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्यात नाशिक येथे चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांचा सत्कार
चोपडा,दि.३ (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक विभाग नाशिक येथे आयोजीत एस टी चा वर्धापन दिन व २५ वर्ष विना अपघात सुरक्षित सेवा देणारे चालक व महामंडळात उत्कृष्ट कामगीरी करणारे कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न कर्मचारी यांचा गुणगौरव पुरस्कार वितरण व लोकार्पण सोहळा दिनांक १ जुन रोजी मेळा बसस्थानक नाशिक आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नुकताच जाहीर झालेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक सर्वेक्षण २०२५/२६ अभियानात चोपडा आगाराने या वर्षी देखील आपले कामगिरीचे सातत्य कायम ठेवुन प्रादेशिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवल्याने चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचा सत्कार प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांनी ट्राॅफी व सन्मानचिन्ह देऊन केला *विशेष म्हणजे 'अ' वर्ग गटात सलग तीन पुरस्कार मिळवणारा चोपडा आगार हा महाराष्ट्रातील एकमेव आगार ठरला.* यावेळी प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर व प्रदेशातील तसेच विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
