धानोरा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 धानोरा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

चोपडा दि.२१(प्रतिनिधी): झि तो महाजन माध्यमिक व ना भा पाटील ज्यूनियर कॉलेज धानोरा विद्यालयात आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन प्राचार्य के एन जमादार यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला.

        विद्यालयाच्या मैदानावर योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन ज्येष्ठ शिक्षक एस एस पाटील व उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. योगशिक्षक व क्रीडाविभाग प्रमुख  देविदास महाजन यांनी योगवर्गाचे संचालन केले. विद्यार्थ्यांना विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून सराव करून घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास सांगितला. योगाचा मुख्य उद्देश आत्मज्ञान, चित्तशुद्धी, आत्म्याला परमात्माशी जोडणे हा असून योगा मधून विविध आजारावर मात करून निरोगी जीवन जगता येते असे सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यामागे वैज्ञानिक, भौगोलिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणि कारणे असून या दिवशी सूर्याची किरणे कर्कवृत्तावर थेट पडतात असे सांगितले. वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. भगवान शिव यांनी याच काळात सप्तर्षींना योगविद्या दिली. भगवान शिव आदियोगी म्हटले जातात. महर्षी पतंजलिनी योगविद्येवर ग्रंथ लिहिली असे सांगितले.

   भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघा मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साठी प्रस्ताव मांडला. योगाचे महत्व व गरज जगाला पटवून दिली. १७७ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. आज आपण सामोरं जगात बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करीत आहोत अशी सविस्तर माहिती देऊन नियमित योगा करण्याचे आवाहन योगशिक्षक देविदास महाजन यांनी केले.

      विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, जेष्ठ संचालक बी एस महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, अनिल महाजन,  व्हि सी पाटील, प्राचार्य के एन जमादार, उपमुख्याध्यापक एस पी महाजन, पर्यवेक्षक एल डी पाटील यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना योगदिन व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगिता मॅडम यांनी तर आभार व्हि डी कोष्टी सरांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने