काळभैरव माध्यमिक विद्यालय सनपुले येथे योग दिन उत्साहात साजरा
चोपडा , दि. २१ (प्रतिनिधी ): अडावद येथील काळभैरव माध्यमिक विद्यालय सनपुले तालुका चोपडा येथे आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम योग दिनानिमित्त विद्यालयाचे अध्यक्ष प्रा विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे यांच्या विषयी माहिती दिली. योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर अध्यक्ष विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून अनेक योगक्रिया करवून घेतल्या. विद्यार्थ्यांसोबतच मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी देखील योग दिनानिमित्त योगक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
योग दिनाचे अवचित्य साधून विद्यालयास . सर्व कर्मचाऱ्यांनी देखील योगक्रियेत सहभाग नोंदवला.योग क्रिया कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक मंगेश चौधरी उपशिक्षक एस सी पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
