चोपडा शिवारात शेतात बकऱ्या घुसल्याने वाद होऊन चौघांकडून शेतकऱ्यासह मुलास जबर मारहाण.. शहर पोलिसात गुन्हा दाखल

 चोपडा शिवारात शेतात बकऱ्या घुसल्याने वाद होऊन चौघांकडून शेतकऱ्यासह मुलास जबर मारहाण.. शहर पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा दि.१८(प्रतिनिधी): चोपडा शेत शिवारातील शेतात 30ते40 बकऱ्या घुसल्याने  पिकांची व ठिबक नळ्यांचे नुकसान झाल्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने बकऱ्या ठेंगा सोसायटीत तक्रारीसाठी नेण्याच्या बोलण्याच्या कारणावरून वाद होऊन चार जणांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह मुलास  लाकडी शिंगाड्याने बेदम मारहाण करून बंदुकीची गोळी घालून ठार मारेल असा दम दिल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींना  दवाखान्यात उपचारार्थ  दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, चोपडा शिवारातील शेत गट क्रमांक 394 व 395 या शेतात वत्सलाबाई तुकाराम पारधी यांच्या 30 ते 40 बकऱ्या घुसल्याने शेतातील ठिबक नळ्या व पिके खाऊन जबर नुकसान केले .त्यामुळे निंमबटाईवर शेत कसणारे जोगीलाल  शंकर पारधी रा. रामपुरा यांनी बकऱ्यांची तक्रार ठेंगा सोसायटी कडे देण्याचे ठरल्याने वत्सलाबाई यांचा भाचा  पवन सिताराम पारधी (रा. रामपुरा) ,निलेश बापु भालेराव (पंचशील नगर), विक्की अशोक पारधी (आदर्श नगर), व मयूर यादव सोनार मल्हारपुरा या चौघांनी जोगीलाल शंकर पारधी (वय 60) व त्यांचा मुलगा दीपक जोगीलाल पारधी (वय 30)या दोघांना लाकडी शिंगाड्याने जबर मारहाण केली तसेच  पवन पारधी याने दीपक यास अश्लील शिवगाळ करीत माझ्या आत्याच्या बकऱ्या धरून ठेवतोस  तुला आत्ताच बंदुकीची गोळी घालून ठार मारून टाकतो अशी धमकी दिली.

याप्रकरणी जोगीलाल शंकर पारधी यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 भारतीय न्याय दंड संहिता कलम 109, 296 ,,115( 2), 351(3)3 52 ,(3 )5 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने