कस्तुरबा विद्यालयाची विद्यार्थिनी देवश्री मोरे राज्यात तृतीय..!
चोपडा,दि.४(प्रतिनिधी) -- येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. देवश्री जितेंद्र मोरे (आठवी) ही भारती विद्यापीठ पुणे तर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या गणित सुबोध परीक्षेत १०० पैकी ९८ गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक मिळवीत यश प्राप्त केले आहे.
संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड.संदीप पाटील,सचिव डॉ स्मिता पाटील यांनी कु. देवश्री जितेंद्र मोरे व तिचे पालक जितेंद्र मोरे यांचा सत्कार केला.वअभिनंदन केले.यावेळी मुख्याध्यापक एस एल पाटील, माजी मुख्याध्यापक आर डी साठे,विनोद पाटील, एन आर पाटील,कपिल बाविस्कर, व्हि.सी पाटील आदी उपस्थित होते.
