बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

 बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

चोपडा,दि.२ (प्रतिनिधी): अमर संस्था चोपडा संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण ८७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विज्ञान शाखा

विज्ञान शाखेत ६८७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व ६८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रथम क्रमांक – संकेत अजय जोशी (९०.३३%)

द्वितीय क्रमांक – कपिल शामकांत सोनवणे (८९.५०%)

तृतीय क्रमांक – सेजल संतोष अग्रवाल (८९.१७%)

वाणिज्य शाखा

वाणिज्य शाखेत ७३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रथम क्रमांक – योगेश्वरी हुकुमचंद सोळंकी (७३.००%)

द्वितीय क्रमांक – रोशनी विजय पाटील (७०.६७%)

तृतीय क्रमांक – भावेश भूषण पवार (७०.१७%)

कला शाखा

कला शाखेत ११३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रथम क्रमांक – दिव्या राजेंद्र पाटील (७२.६७%)

द्वितीय क्रमांक – तुळसाबाई मनोहर कोळी (७२.१७%)

तृतीय क्रमांक – प्रियंका परशुराम धनगर (७१.५०%)

विषयानुसार विशेष यशजीवशास्त्र विषयात ५०७ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले. शिक्षिका ऐश्वर्या दीक्षित यांनी मार्गदर्शन केले.

भौतिकशास्त्र विषयात ९० विद्यार्थ्यांना ८८ गुण प्राप्त झाले.

गणित विषयात ८८ विद्यार्थ्यांना ८९ पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेरसायनशास्त्र विषयात ९२ विद्यार्थ्यांना ८९ पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले.या विषयांसाठी विलेश चौधरी, अरुण वाघ व जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव नितीन जोशी, ज्येष्ठ सभासद डी. बी. पाटील, व्यवस्थापक विजय गोकुळ दीक्षित, प्राचार्या प्रीती धनवंत सरवय्या तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने