काजीपुरा रस्त्यावर झाडाला लागली आग अन् चोपडा नपाच्या अग्निशमनची सुसाट धाव..!

 

 काजीपुरा रस्त्यावर झाडाला लागली आग अन् चोपडा नपाच्या अग्निशमनची सुसाट धाव..!



चोपडा,दि.२१(प्रतिनिधी):--शिरपूर रस्त्यावरील काजीपुरा फाट्यावरील रस्त्याच्या कडेलाच असलेल्या हिरव्यागार भल्या मोठ्या निंबाच्या वृक्षाला  सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावून तिथून पोबारा केला.

     मात्र काही वेळातच झाडाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीचे आगडोंब रस्त्यावर पडत होते.शिरपूर रस्त्यावर दुतर्फा वाहतूक थांबली कारण हवेमुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाश्यांच्या अंगावर आगीच्या ठिणग्या पडत होत्या.त्याचवेळी दुचाकीवरून निलेश पाटील राहणार (कुसुंबा)हे जात असतांना त्यांनी समयसूचकता दाखवून सुनील पाटील(वाळकी)आणि मिलिंद सोनवणे पत्रकार यांना दूरध्वनीवर कळवली याची दखल घेत क्षणाचा ही विलंब न करता पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांचे सासरे रविंद्र बळीराम पाटील(उद्योजक)यांना सांगितली.त्यांनी लगेचच नगरपरिषदेत कळवून सूचना दिल्या.

काही वेळातच  नगरपरिषदेचे अग्निशामकचे प्रमुख उमेश कापरे,गाडीचालक अमीन शिकलीकर,फायरमन भूषण साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली आणि रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या ही हटवून रस्ता मोकळा करून दिला.भर उन्हाळ्यात अश्या प्रकारच्या घटना करणाऱ्या वर कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. नगरपरिषद देच्या कर्मचाऱ्यांचे आणि या घटनेत सहभागी असलेले सुनील पाटील (वाळकी)निलेश पाटील (कुसुम्बा)रविंद्र बळीराम पाटील,निलेश जाधव(नगराध्यक्षा यांचे स्वीयसहायक)आणि पत्रकार मिलिंद सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होतेय.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने