कुरवेल येथे जनजागृती करून डेंग्यू दिवस साजरा

 कुरवेल येथे जनजागृती करून डेंग्यू दिवस  साजरा

चोपडा दि.१६(प्रतिनिधी): जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसारतालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली...आज दिनांक-१६ मे २०२६  शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या निमित्ताने , प्राआकेंद्र-चहार्डी अंतर्गत उपकेंद्र-कुरवेल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकामध्ये, डासांमुळे होणारा डेंग्यू, चिकूनगुणिया आणि हिवताप विषयी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपाय योजना व आरोग्य विषयक माहिती देऊन डेंग्यू अजराबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामस्थांना वरील आजारांबद्दल माहिती देऊन त्यांची काळजी घेण्याची सवय लावणे हे होते.तालुका हिवताप पर्यवेक्षक- जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक- विजय देशमुखयांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना डेंग्यू आजाराविषयी समुपदेशन केले की,

हिवताप (Viral Fever): अचानक ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा ही लक्षणे दिसतात. पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डेंग्यू: हा आजार एडीस या डासांमुळे होतो. सकाळी व संध्याकाळी चावणाऱ्या या डासांपासून बचावासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नये, झाकलेले पाणी वापरावे, मच्छरदाणी वापरावी.

मलेरिया: अनोफिलीस या डासामुळे होतो. तापासोबत थंडी व घाम येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो.

ग्रामस्थांना  दर आठवड्याला घराभोवती पाणी साचलेले ठिकाण तपासण्याचे व स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.शेवटी ग्रामस्थानी “माझे गाव– आरोग्य संपन्न गाव” ही शपथ घेतली आणि आपल्या कुटुंबीयांनाही डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाचे संदेश पोहोचवण्याचे आश्वासन दिले.तसेच आरोग्य पथकाकडून देखीलजनजागृतीपर कंटेनर सर्वेक्षण,संशयित ताप रुग्ण रक्त नमुने घेऊन किरकोळ उपचार करण्यात आले.याप्रसंगीआरोग्य सेवक- अरविंद पाटील, आरोग्य सेविका- छाया धनगर, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने