राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबिरात प्रताप विद्या मंदिराने विविध स्पर्धेत तीन गोल्ड व एक सिल्वर मेडलची दिमाखदार कामगिरी

 राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबिरात प्रताप विद्या मंदिराने विविध स्पर्धेत तीन गोल्ड  व एक सिल्वर मेडलची दिमाखदार कामगिरी

चोपडा दि.१४(प्रतिनिधी) : 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी  अमळनेर मार्फत दोंडाईचा येथे झालेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिर CATC 202 आयोजित करण्यात आले होते. त्यात चोपडे शिक्षण मंडळ संचलित  प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील एनसीसीच्या कॅडेट्सनी आपला यशस्वी सहभाग नोंदवला. शिबिरांतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये *तीन गोल्ड मेडल  व एक सिल्वर मेडल* पटकावले. या प्रशिक्षण शिबिरात शिस्त, राष्ट्रीय एकात्मता, शस्त्र युद्ध कौशल्य(फायरिंग) सायबर सुरक्षा, नकाशा वाचन, आपत्ती व्यवस्थापन, रस्ता वाहतूक सुरक्षा, मौखिक व दंत आरोग्य तसेच विविध खेळ विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले.

 या प्रशिक्षणा दरम्यान *छत्रपती संभाजी नगर  महाराष्ट्र बटालियन ग्रुप कमांडर  ब्रिगेडियर अनुप बरबरे सर यांचे देखील बहुमोल मार्गदर्शन लाभले*. याप्रसंगी त्यांनी उच्च ध्येय कठोर परिश्रम सातत्य शिस्त आणि चिकाटी यांचे महत्त्व विशद केले.

सदर प्रशिक्षण बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे, ए ओ लेफ्टनंट कर्नल  पिनाकी बनिक, सुभेदार मेजर गजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

 सदर शिबिरात विविध स्पर्धांमध्ये प्रताप विद्या मंदिर, चोपडा एनसीसी कॅडेट्सना तीन गोल्ड मेडल व एक सिल्वर मेडल प्राप्त झाले.

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन माननीय राजाभाई मयूर,सचिव आदरणीय माधुरी मयूर संचालक  आदरणीय उर्मिलाबेन गुजराथी, मा. चंद्रहासगुजराथी, मा. भूपेंद्रगुजराथी, आदरणीय रमेश काकाजी जैन  प्रशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील मॅडम उपमुख्याध्यापक श्री ए एन भट सर, पर्यवेक्षक श्री. एस.व्ही.करमरकर सर, श्री पी.ए. नागपुरे सर ,श्री एन.एम. राजपूत सर संस्थेचे समन्वयक आदरणीय श्री गोविंदगुजराथी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. या सर्व कॅडेट्स यांना सेकंड ऑफिसर श्रीमती जयश्री बडगुजर मॅडम आणि सेकंड ऑफिसर श्री रोहन पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने