चोपडा आगारातर्फे विनामूल्य फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन
चोपडा दि.१ (प्रतिनिधी ) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा बसस्थानकावर विनामुल्य फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य सोनवणे,विजय नथ्थु महाजन,वसंत उखा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, डिजिटल युगामध्ये पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या बालकांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्वांना प्रवासामध्ये वाचन संस्कृती आवड निर्माण करुन प्रतिक्षा काळात बस स्थानकावर कधी कधी बराच वेळ ताटकळत बसावे लागते बसची वाट पाहिली लागते अशा वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग वाचनासाठी व्हावा
या उद्देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवस वर्ष निमित्ताने परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी देणगीदार यांच्या कडुन जवळपास ७००पुस्तके उपलब्ध करून चोपडा बसस्थानकावर फिरते वाचनालय उभारले.या स्तुत्य उपक्रमाच्या वाचनालयास कै धर्मेंद विजय महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुनिता महाजन, वर्डी स्व. श्री शा गो पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन चव्हाण, महात्मा गांधी महाविद्यालया तर्फे पुस्तके भेट देण्यात आली.यावेळी देणगीदारांचा सत्कार महेंद्र पाटील यांनी केला.प्रास्ताविक आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले तर आभार भगवान नायदे यांनी मानले.यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिकारी सिद्धार्थ चंदनकर, स्थानक प्रमुख नितीन सोनवणे,सागर सावंत, श्वेता धर्मेंद्र महाजन,रिना पाटील कलिम शेख, संदिप पाटील,अजय साळुंखे,रमेश अहीरे सह कर्मचारी प्रवाशी बांधव उपस्थित होते.
