चोपडा येथे स्व.शरदचंद्रिका अक्का नर्सिंग कॉलेज मध्ये "हिवताप दिवस" साजरा
चोपडा दि.२५(प्रतिनिधी) जागतिक हिवताप (मलेरिया) दिनाचे अवचित्य साधूनजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार,व तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रसाद पाटील, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र चोपडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी तथा नागरी भागातील सर्व आरोग्य केंद्राअंतर्गत गावांतील जनतेला हिवताप या आजाराविषयी आरोग्य शिक्षण तथा त्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने... दिनांक-25 एप्रिल 2026 रोजी हिवताप दिनाच्या निमित्ताने स्व.शरदचंद्रिकाअक्का पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग चोपडा, येथील परिचारिकाचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाउपजिल्हा रुग्णालय चोपडा येथील वैद्यकीय अधिकारी- सौ.डॉ.निलिमा देशमुख यांनी हिवताप आजाराबाबत विषयी सखोल मार्गदर्शन तसेच आरोग्य शिक्षण दिले.
हिवताप दिवस हा 25 एप्रिल रोजी संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. याचा हेतू हिवताप आणि इतर कीटकजन्य आजाराबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागरण व्हावे त्याचप्रमाणे प्रतिबंधन उपाय याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात यावे. डास या किटकामार्फत पसरणाऱ्या आजारात आपल्या महाराष्ट्रात हिवतापाचे दोन प्रकार आढळून येतात (प्लास्मोडियम व्हायव्याक्स आणि प्लाज्मोडियम
फॅलसीफेरम)या व्यतिरिक्त मलेरी आणि ओवेल हे आणखी दोन मलेरियाचे प्रकार आहेत परंतु ते महाराष्ट्र राज्यात आढळत नाहीत. डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंगू, चिकनगुनिया हत्तीरोग हे देखील महाराष्ट्रात आढळून येतात.
डेंगू,चिकनगुनिया हे आजार एडिस इजिप्ती नावाच्या डासांच्या मादी पासून पसरतात आणि हत्तीरोग हा आजार क्युलेक्स डासाच्या मादी पासून पसरतोअसेही त्यांनी सांगितले
तसेच चोपडा तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर यांनी देखीलजागतिक मलेरिया दिवस कुणासाठी व का साजरा केला जातो ?याबाबत विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे तालुका आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना हिवतापाबाबत माहिती दिली.शहरी भागातील आरोग्य सेवक-रामुला मडावी, अशोक वारे यांनी उपस्थिती लावली.
तथा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या-श्रीमती.करुणा चंदानशिव मॅडम,आणि उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, व उपस्थित नर्सिंग चे सर्व विद्यार्थी यांनी हिवताप दिवस साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
