हेमकांत गायकवाड यांची निवड
चोपडा दि.२५(प्रतिनिधी): अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी ही निवड जाहीर करून अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्याचा आराखडा स्पष्ट करण्यात आला. महाराष्ट्रभर माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्राहक संरक्षण तसेच कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.दरम्यान, हेमकांत गायकवाड यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
