दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाचन संस्कृतीतून स्पर्धात्मक विकास .

 दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाचन संस्कृतीतून स्पर्धात्मक विकास


चोपडा दि.१३(प्रतिनिधी) : दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव’ निमित्ताने’ दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर आधारित ‘सामान्य ज्ञान स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त घेण्यात आली. स्पर्धा घेण्यापूर्वी 10 दिवस आधी महाराष्ट्रातील 50 समाज सुधारकांची पीडीएफ पुस्तिका विद्यार्थ्यांना त्यांच्या WhatsApp ग्रुपवर टाकण्यात आली. विद्यार्थ्यांनी रोज ह्या पुस्तिकेचे त्यांच्या वेळेनुसार वाचन केले. ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागली. यातून वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन वाचन संस्कृति टिकवण्यास मदत होईल. 

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कौशल्य वाढावे, विविध स्पर्धां परीक्षांची माहिती व्हावी आणि सामाजिक क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे स्वरूप बहुपर्यायी प्रकारचे होते. एकूण प्रश्न 50 असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते. परीक्षेसाठी वेळ मर्यादा 1 तासाची निश्चित करण्यात आली. स्वतंत्र प्रश्नपत्रिका व स्वतंत्र उत्तर पत्रिका देण्यात आली. अशी एकूण 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली. ह्या परीक्षेत महाविद्यालयातील एकूण 210 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व बक्षीस म्हणून महापुरुषांचे पुस्तके देण्यात येणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

सदर स्पर्धा महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. स्पर्धेस कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य  पी. एस. पाडवी व पर्यवेक्षक ए. एन. बोरसे उपस्थित होते.  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी  एस. टी. शिंदे,  संदीप पाटील,  प्रमोद. आर. पाटील,  भूषण बिरारी,  संदीप देवरे,  व्ही. डी. शिंदे, . दीपक करणकाळ, निवृत्ती पाटील, श्रीमती. अनीता सांगोरे मॅडम, बाबासाहेब जाधव, दिनेश अलाम इत्यादि शिक्षकांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले व परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने