समाजकार्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) येथील समाजकार्य महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची 200 वी जयंती साजरी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे माजी सभापती प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री गुजराती यांनी महात्मा फुले यांचा जीवन कार्याचा पाढा वाचून त्यांनी केलेले अनमोल कार्याचा उलगडा केला. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर सौंदाणकर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचासर्व स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
