सहाय्यक प्राध्यापक चंदू कोळी यांना पीएचडी प्रदान

 सहाय्यक प्राध्यापक चंदू कोळी यांना पीएचडी प्रदान

चोपडा,दि.28(प्रतिनिधी): SVKM NMIMS ग्लोबल युनिव्हर्सिटी, धुळे येथील सहाय्यक प्राध्यापक श्री चंदू कोळी यांना गणित विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

“स्टडी ऑफ हिट अँड मास ट्रान्सफर इफेक्ट ऑन MHD कॉन्वेक्टिव फ्लो” या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथील गणित विभागप्रमुख प्रा. डॉ. शांताराम साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

श्री कोळी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल SVKM NMIMS युनिव्हर्सिटीचे डीन डॉ. निलेश साळुंके, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, KBCNMU गणित विभागाचे संचालक डॉ. किशोर पवार , प्राध्यापक वृंद व  विरवाडे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  ते  विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडे येथील शिक्षक विलास कोळी यांचे मोठे भाऊ आणि माजी जि.प.सदस्य राजू कोळी  यांचे भाचे आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने