चोपडा मूकबधिर विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

 चोपडा मूकबधिर विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा 

चोपडा,दि.९ (प्रतिनिधी)स्व.तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ , विटनेर संचालित चोपडा मूकबधिर विद्यालयात  ८ मार्च २०२६ वार रविवार रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे आधारस्तंभ  श्री भावलाल डोंगर पाकळे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यार्थी पालक महिला उपस्थित होते.सुरुवातीला सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन थोर महिलांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तद्नंतर पाहुण्यांचे व विद्यालयातील सर्व कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेचे वाचा उपचार तज्ञ श्रीमती मिनाक्षी पाकळे  यांनी आजच्या दिनाचे महत्व सांगून मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन विशेष शिक्षिका श्रीमती अश्विनी पाकळे  यांनी केले तर त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षांचे मनोगत झाले. शेवटी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे वसतिगृह अधिक्षक श्रीमती वैशाली पाकळे यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने