स्वतःचा उद्योग उभारून ओळख निर्माण करा - समीर भाटीया यांचे स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन
चोपडा,दि.४(प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी दिनांक 2/2/2026 पासून ते 7/2/2026 दरम्यान आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व सचिव डॉ.सौ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी अभियाना दरम्यान भेट देवून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, जळगाव जिल्हा समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग, कबचौ उमवि जळगाव डॉ.संजय काशिनाथ पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम बागूल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी यावेळी भेट देऊन यथोचित मार्गदर्शन केले
व्याख्याते धरणगाव येथील समीर भाटीया यांनी स्वयंरोजगार व युवतींसाठी विविध शासकीय योजनांविषयी जनजागृतीपर सखोल मार्गदर्शन केले. यात त्यांनी स्व-व्यवसाय निर्माणासाठी विविध उत्कृष्ट आर्थिक सहाय्य योजना, त्यातील आर्थिक सहाय्य रक्कम, त्याची पात्रता तसेच या योजना ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण व नियमित रोजगार मिळवून देण्यासाठी कसे उपयुक्त आहे हे उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून दिले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले.
यानंतर चोपडा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. वैशाली वैद्य यांनी सुदृढ आरोग्यासाठी तरुणींची जीवन शैली कशी असावी या बाबत विस्तृत असे मार्दर्शन केले. फास्ट फूड सतत खाल्ल्याने बिपी, शुगर, लट्ठपणा आदि होऊ शकतात. केमिकॅल युक्त सौदर्य प्रसाधने वापरल्यामुळे काय काय दुष्परिणाम होतात त्याची माहिती दिली. रस युक्त अन्न, ताजा भाजीपाला, फळे ताक याचा जेवणात समावेश असावा. आहार नियमित, वेळेवर व नियंत्रित घ्यावा पुरेशी झोप घ्यावी अश्या पद्धतीने सुदृढ आरोग्यासाठी अनेक मुळ मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. दोन्ही व्यक्त्यानी सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सौ प्रिती रावतोळे (युवतीसभा प्रमुख), डॉ. डी. डी. कर्दपवार (विद्यार्थी विकास अधिकारी), डॉ. आर आर पवार (सहा विद्यार्थी विकास अधिकारी), समिती सदस्य डॉ सौ.के. एस. क्षीरसागर, सौ. सुनिता पाटील, डॉ. संगीता पाटील, सौ रजनी जैस्वाल, सौ. हर्षा देवरे, सौ. पूजा पुन्नासे, सौ. आरती पाटील, धनंजय चौधरी, निलेश भाट, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान रजिस्ट्रार डी. एम पाटील, मुन्ना साळुंखे, व्ही. पी.हौसे, डॉ. सी.आर. देवरे, डॉ. डी.एस.पाटील, डॉ. अभिजित साळुंखे, रवी पाटील, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.
