नायगाव जि.प.उच्च प्राथमिक शाळेत रंगतरंग कार्यक्रम संपन्न
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)नुकतेच जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा नायगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी वर्षानिमित्ताने आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी रंगतरंग कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नूरजहाँ सरफराज तडवी, सरपंच नायगाव तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज कलिंदर तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजीव सिताराम शेटे प्रभारी केंद्रप्रमुख किनगाव व मनोज देशमुख पोलीस पाटील नायगाव, वृषाली निलेश पाटील,उपसरपंच नायगाव, उपाध्यक्ष,सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती हे उपस्थित होते.
रंगतरंग कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांना वाव देण्याकरिता जवळजवळ 40 नृत्यातून सादरीकरण केले. यावेळी गावातील ग्रामस्थ,विविध संस्थेचे पदाधिकारी,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक,माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक निवृत्ती गोकुळ भिरूड,शिक्षक राजेंद्र पारधी,भरत शिरसाठ सुरेश खुनेपिंप्रे,मालसिंग भुगवाडे,किशोर पाटील,भटराज शिरसाठ,मधुकर मगरे,ज्येष्ठ शिक्षिका भारती पाटील,नजमा तडवी,ललिता माळी यांनी मेहनत घेऊन सहकार्य केले.
रंगतरंग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्ताविक भरत भीमराव शिरसाठ व भारती पाटील मॅडमतसेच सुरेश खुनेपिंप्रे यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आभार मुख्याध्यापक निवृत्ती भिरूड यांनी मानले.
