विकास विद्यालयाच्या एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप

 विकास विद्यालयाच्या एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप

गणपूर,ता चोपडा,दि. 6 (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून कुटुंबासह शाळेचे नाव उज्वल करावे असे मत शेंदुर्णी एज्यूकेशन संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड यांनी येथील विकास माध्यमिक विद्यालयाच्या एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभावेळी अध्यक्ष पदावरून बोलतांना मांडले.  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्याध्यापक ए. व्ही. पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांमधून दर्शनी परेश पाटील,व वेदांती प्रेमराज पाटील यांनी तसेच यू. यू. पाटील ,ऍड बाळकृष्ण पाटील,अंबादास राजपूत,प्रवीण पाटील,किरण करंदीकर,शिक्षक व्हि.पी.अहिरे, वर्ग शिक्षक ए.बी. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एन. पाटील यांनी केले. वउपस्थितांचे आभार आर. टी.सावकारे यांनी मानले.  कार्यक्रमाला माजी जी प सदस्यसंभाजी पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील,सरपंच भूषण गायकवाड,भवाळे चे सरपंच आनंदराव पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण पाटील,संपर्क अधिकारी एम बी पाटील,आत्माराम पाटील, व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


 *फोटो कॅफ्शन:* 

गणपूर(ता चोपडा)मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने