आनंद सुपर शॉपी चा सुपर उपक्रम..मिठाई व फरसाण वाटप करून गरीब विद्यार्थींनींचा द्वीगुणीत केला आनंद..!

 आनंद सुपर शॉपी चा सुपर उपक्रम..मिठाई व फरसाण वाटप करून गरीब विद्यार्थींनींचा द्वीगुणीत केला आनंद..! 

चोपडा दि.१७(प्रतिनिधी) : दिवाळी म्हटली की गोडवा आलाच.. सर्वांच्या घरी दिव्यांच्या लख्ख प्रकाश, गोडधोड अन् फरसाणची रेलचेल ..मात्र अशातच एक वेळचं पोटभर अन्न  न मिळणारे असंख्य कुटुंब आहेत.त्यांची दिवाळी ही दिवाळी नसून जीवनातील लख्ख अंधार.. फक्त  मनगटाच्या जोरदार पोटाची खळगी भरायचे एव्हढेच स्वप्न..कसली दिवाळी न कसला दसरा हे न उमगणारे शब्द पाचवीला  पूजलेले  हे ध्यानी घेत चोपडा शहरातील आनंद सुपर शॉपीचे संचालक डॉ. निर्मल कुमार टाटिया यांनी आपले नावाप्रमाणेच निर्मळ मनाने आदिवासी गरिब विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर हास्य खुलावे म्हणून मिठाई व फरसाणचे पाकिटे वाटप करून आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणून माणुसकीची झलक दाखवल्याने मुंलींचा आनंद द्विगुणित करून "आनंद सुपर शॉपी" दुकानाचे सार्थकी ठरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

 सेवाभावी कार्य हाती घेतलेले  रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष चेतन कुमार टाटीया यांच्या संकल्पनेतून  दिवाळीचे औचित्य साधत  गरिबी विद्यार्थींनींना काहितरी दिलं पाहिजे या विचाराने कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात संपर्क साधून वसुबारस च्या शुभमुहूर्तावर  आनंद सुपर शॉपी या दुकानास गरिब विद्यार्थीनींचे पाय लागावेत हा महान विचार डोळ्यासमोर ठेवत दुकानात बोलावून सर्व विद्यार्थींनींना  मिठाई व फरसाणचे वाटप करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.

 यावेळी डॉ. निर्मलकुमार टाटिया, वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,सौ.सपना निर्मल टाटिया,श्री. मनीष निर्मल टाटिया,सौ.प्रियंका मनीष टाटिया, चेतनकुमार टाटीया ,अधिक्षिका कावेरी कोळी ,क्षमा चेतन टाटीया आणि सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने