प्रा.संजय नेवे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 प्रा.संजय नेवे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

जळगाव दि.५(प्रतिनिधी)जळगाव पी.एन.गाडगीळ अँण्ड सन्स शोरूम येथील कलादालनात चोपडा येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित, ललित कला केंद्र या अनुदानित कला संस्थेतील प्रा. संजय मनोहर नेवे यांचे" सेरीनीटी  फाउंन्ड म्हणजे निसर्गातील "शांतता"  या विषयांवरील निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच अरुणभाई गुजराथी,माजी विधानसभा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते झाले.

याप्रसंगी प्रा.संजय नेवे यांच्या शिक्षिका व चित्रकर्ती गुरुमाई अंजली गुलजार गवळी, इंदोर, डॉ. अमित भंगाळे,जळगाव, शालिग्राम भिरुड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव,गिरीश ढेरे, व्यवस्थापक पीएनजी गाडगीळ अँड सन्स,प्राचार्य राजेंद्र महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्योजक श्री आशिष अरुणलाल गुजराथी ,प्राचार्य सुनील बारी , प्रा. विनोद पाटील ,प्राचार्य पुरुषोत्तम घाटोळ यांनी अनमोल सहकार्य केले.तर मनोज जंजाळकर,विनोद चव्हाण, तरुण भाटे ,व डॉ. प्रणय वाणी  व डॉ. अपर्णा  वाणी,  योगेश व सौ. रुपाली सुतार, सौ.जागृती नेवे,व पुष्कर वाणी,भुवनेश, नचिकेत नेवे. यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.या प्रसंगी अरुणभाई गुजराथी, अंजली गवळी ,डॉ अमित भंगाळे , प्रा संजय नेवे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.संजय यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र महाजन तर कलाशिक्षक परमेश्वर रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी वसंतलाल गुजराथी, रोटे.योगेंद्र भोळे, बन्सिलाल परमार, कवयित्री पौर्णिमा हुंडिवाले, कलाध्यापक जिल्हा अध्यक्ष एन.ओ.चौधरी,सचिव अरुण सपकाळे,कलाशिक्षक शाम कुमावत,वसंत नागपुरे,पंकज नागपुरे,वाय.आर.पाटील, उल्हास सुतार इ.उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने