चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त "जुलुस"
चोपडा दि.५(प्रतिनिधी) चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त "जुलुस"चे आयोजन करण्यात आले होते. सुनिल पाटील (वाळकी, चोपडा )माजी जळगाव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या कडुन स्वागत कक्ष उभारून, मुस्लिम बाधंवाचे गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले.ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बापुसाहेब कैलास पाटील, प्रमुख पाहुणे भाउसाहेब प्रविण गुजराती,गोपाळ भाउ सोनवणे, जियोद्दीन काझी, नोमान काझी, अशपाक पठाण सर, आदी उपस्थित होते
आठवड्यात जगभरातील मुस्लिम बांधव मिलाद-उन-नबी साजरा करतात, ज्याचा शब्दशः अर्थ "पैगंबराचा जन्म" असा होतो. पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा जन्म इ.स. ५७० मध्ये मक्का येथे झाला आणि ते एक व्यापारी म्हणून वाढले, जे त्यांच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जात होते.