प्रताप विद्यामंदिराचा डंका ..जिल्हास्तरीय बुद्धिबळ खेळासाठी निवड

 प्रताप विद्यामंदिराचा डंका ..जिल्हास्तरीय बुद्धिबळ खेळासाठी निवड 

चोपडा दि.२६(प्रतिनिधी) : प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील 14 वर्षे वयोगटातील भारद्वाज शकुंतलानंदनसिंह महाले 8वी तसेच 19 वर्षे वयोगटातील निखिल नितीन शिंपी 12 वी विज्ञान तसेच प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम येथील 17 वर्षे वयोगटातील  हिमांशू चंद्रकांत बाविस्कर 9वी  या खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आज रोजी चावरा इंटरनॅशनल स्कूल अकुलखेडा या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेतून विजय होऊन निवड करण्यात आली. या खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,चेअरमन,सचिव संस्थेचे सर्व पदाधिकारी, समन्वयक  प्रताप विद्यामंदिर माध्यमिक व प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम  येथील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी मनःपूर्वक कौतुक केले.या खेळाडूला शाळेचे क्रीडाशिक्षक नरेंद्र एन. महाजन, सर, समाधान प्रभाकर माळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने