लासुरला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न

लासुरला  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न 

लासुर ता. चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) | येथे  महात्मा गांधी विद्यालयात राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन   प्रा. आ. श्री चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश 1200 ते 1500  लोकांना प्रदान केले.  शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.

यावेळी तहसीलदार  श्री. भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी श्री अनिल विसावे, श्री विरेंद्र राजपूत सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रदिप लासुरकर ,ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी,महावितरणचे अभियंता राजपुत,राजेश मोरे ग्रामीण पाणीपुरवठा,विकास पाटील माजी उपनगराध्यश ए. के. गंभीर सर,देविलाल बाविस्कर सर,कैलास बाविस्कर, , ,किशोर महाजन,सुरेश महाजन,आबा बाविस्कर,वासुदेव महाजन,जितेंद्र महाजन,राहुल पाटील , युसुफ खाटीक कल्पेश माळी.मुस्ताक पठाण नौमील मिस्तरी नारायण बागुल पिताराम पावरा रामचंद्र पावरा शहारुख खाटीक, व सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते. कार्यक्रम संचालन व समारोप- सूत्रसंचालन श्री. भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा) यांनी केले.


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने