धानोरा शेत शिवारात नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहणी.. आमदारांसह जिल्हाधिकाऱ्याची उपस्थिती
चोपडा,दि.८(प्रतिनिधी)अवकाळी पावसाचा तडाखा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त धानोरा परिसरात बसला असून या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांना सोबत घेऊन केली असून नुकसान झालेल्या पिकाचा पंचांनामा त्वरित करावा तसेच पिक विमा कंपन्यांनीही बळीराजाकडे पैशांची मागणी करू नये अशा अशा कडक शब्दात सुचना केल्या.
दिनांक ०८ मे गुरुवार रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे हे सकाळी ९:३० वाजता धानोरा परिसरातील तसेच इतर गावांमध्ये वादळी वारा , गारपिट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली .झालेल्या नुकसानीचा पंचनामा करतांना प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ताबडतोब पंचनामा करा कोणाही शेतकऱ्याचा नुकसान झालेल्या पिकाचा पंचांनामा बाकी राहू देऊ नका असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच पिक विमा कंपन्यांननी शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी पैशाची मागणी करु नये अशी तंबीही पालकमंत्री महोदय व आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी संबंधित अधिकारी व पिक विमा कंपनीच्या प्रतिनीधींना दिली .यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,कृषी अधिकारी आर.एन. पाटील ,गटविकास अधिकारी अनिल विसावे हे उपस्थित होते.