अमर संस्था संचलित लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा जि. जळगाव, इ. १२ वी च्या १०० % निकालाची परंपरा कायम
*चोपडा:-(प्रतिनिधी)*लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत गेल्या चार वर्षापासून इ. १२ वी च्या १०० % निकालाची परंपरा कायम ठेवत यंदा विज्ञान शाखेत *कु.नंदनी विलास बारेला ८१.१७ गुण* मिळाले असून तिचा शाळेत प्रथम क्रमांक आला आहे...
तसेच कु.गीतांजली अंकुश माळी हिला ७९.५० गुण मिळाले असून तिच्या द्वितीय क्रमांक आला आहे व तृतीय क्रमांकावर कु.संजना दिनेश बारेला हिला ७८.०० गुण, कु.पूजा थावऱ्या बारेला ७८.०० गुण, अंजली छत्तरसिंग बारेला ७८.०० गुण प्राप्त झाले आहेत . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी, तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.💐💐