परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान

 


परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान 

अमळनेर दि.८(प्रतिनिधी)बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत संपूर्ण भारत देशात बाल विवाहाच्या विरोधात धर्मगुरू अभियान राबविले जात आहे . प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर चे गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांनी भाविकांना बालविवाह करू नका असे आवाहन अमळनेर येथे केले आहे .

संत सखाराम महाराज यात्रोत्सव अक्षय तृतीये पासून सुरू झाला असून या यात्रा उत्सवात बालविवाह मुक्त भारत अभियान जनजागरण अभियान बोरी नदी पात्रात राबविले जाणार आहे.

 यामध्ये जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन JRC चे भागीदार ,आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेर जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, विविध धर्मातील धर्मगुरू,जळगाव यांचा सक्रिय सहभाग आहे.

आधार बहुउद्देशीय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवित असलेल्या जस्ट राईट फॉर चिल्ड्रन  प्रकल्पांतर्गत  बालविवाह मुक्त भारत या अभियानात अमळनेर येथील संत  परमपूज्य प्रसाद महाराज यांनी सहभाग नोंदवून भाविकांना, नागरिकांना व सर्व नागरिकांना  बालविवाह मुक्तीसाठी आवाहन केले .

आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील , संचालक रेणू  प्रसाद तसेच  प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, अश्विनी भदाणे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, भावना सूर्यवंशी, दीप्ती शिरसाट, उर्जिता सिसोदे, योगिता पाटील, सुषमा विसपुते   व सहकारी परिश्रम घेत आहेत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने