'ऑपरेशन सिंदूर' च्या यशानंतर साखर, पेढे वाटून आनंदोत्सव
चोपडा,दि.८(प्रतिनिधी)- येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेच्या वतीने भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या यशस्वी कारवाईचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी अभाविप कार्यकर्त्यांनी सैनिकांच्या कामगिरीचा गौरव करत नाव 'ऑपरेशन सिंदूर' असल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांच्या विजयाचे प्रतीक म्हणून कपाळाला सिंदूर लावून त्यांच्या पराक्रमाला सलाम केला. घोषणाबाजी करत, फटाके फोडून आणि साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाने शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. शहर मंत्री मुकेश बडगुजर, महाविद्यालय मंत्री कुणाल कोळी, पवन पाटील, पूर्व कार्यकर्ते श्रीकांत नेवे, गौरव सोनार ,मोहित भावे ,राजू स्वामी, दीपक भोसले यांच्यासह अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी भारतीय लष्कराच्या पराक्रमाचे कौतुक करत देशासाठी झटणाऱ्या जवानांना सलाम केला. शेवटी उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला.