भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलात मॉक ड्रिल; विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या उपाययोजना

 भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलात मॉक ड्रिल; विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या उपाययोजना


चोपडा दि.८(प्रतिनिधी)- भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या तणावपूर्ण व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मॉक ड्रिल व सुरक्षाविषयक प्रात्यक्षिके करण्यात आली.

          यावेळी संस्थेच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. दीपक देवरे, प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पर्यवेक्षक साहेबराव पाटील, संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख मंचावर उपस्थित होते.

        याप्रसंगी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड यांनी युद्धजन्य किंवा आपात्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात याची प्रात्यक्षिके सादर केली. तर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या युद्ध विजयाचा आनंद व्यक्त करणाऱ्या चित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            यावेळी चोपडा येथील पंकज महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. दीपक देवरे यांनी 'युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, २२ एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिलच्या माध्यमातून देशातील नागरिकांनी घ्यावयाची काळजी यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात येत आहे. दोन राष्ट्रांमधील वादाचे, तणावाचे रूपांतर युद्धात होणे बऱ्याच वेळा स्वाभाविक असते. अशावेळी नागरिकांच्याही काही जबाबदाऱ्या व कर्तव्ये असतात. नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती व प्रशिक्षण मिळावे यासाठी मॉक ड्रिल केले जात असतात. युद्धाचे सावट असताना किंवा आपात्कालीन परिस्थितीत देशाच्या सैन्य दलाला व देशाच्या ध्येयधोरणांना पाठिंबा देत सहकार्य करण्यासाठी सिव्हिल डिफेन्स या विभागांतर्गत नागरिकांना प्रशिक्षित केले जाते. सायरन वाजल्यानंतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे, लहान मुले, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, जखमींना तत्काळ प्रथमोपचार व वैद्यकीय सुविधा पुरविणे, आग विझविणे, ब्लॅक आउट (प्रकाश बंदी) करणे या उपाययोजनांविषयी त्यांनी माहिती दिली.

      यावेळी प्रताप विद्या मंदिराचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक साहेबराव पाटील यांनी 'युद्धजन्य परिस्थितीत विद्यार्थ्यांची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन केले. जागरूकता अभियान, संसाधन वितरण, समीक्षा, सायरन, स्वसुरक्षा या टप्प्यांमध्ये मॉक ड्रिल केले जाते. मॉक ड्रिलसाठी देशातील महत्वाच्या ठिकाणांच्या श्रेण्या ठरवल्या जातात, असे सांगत त्यांनी अधिक माहिती दिली. उद्योजक आशिष गुजराथी यांनी भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाने यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत भगिनी मंडळ या संस्थेतील शिक्षक विद्यार्थी नेहमीच राष्ट्र व समाजाच्या 

      कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, वनराज महाले यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी केले. या जनजागृती शिबिरास विविध विभागांचे विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने