अंगावर भिंत पडून मयत डॉ.मुसाखान कुटुंबियाचे आमदारांकडून सांत्वन.. घटना स्थळाचा प्रशासकीय यंत्रणेमार्फत पंचनामा
चोपडा दि.१७(प्रतिनिधी): काल जोरदार वादळामुळे भिंत पडून जखमी झालेले डॉक्टर मुसा खान उस्मान खान यांचा रात्री दुर्दैव मृत्यू झालाआहे या घटनेने परिसरात सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी चोपडा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी भेट देत सांत्वन करून तीव्र दुःख व्यक्त केले. हा ओढवलेला दूर्दैवी प्रसंग ह्रदय हेलावून टाकणारा आहे.शासनस्तरावर पंचनामा झाला असून शासकीय नियमात बसत असलेली योग्य ती मदत शासन स्तरावरून मिळवून दिली जाईल असे आश्वासन दिले..
सध्या पावसाळा तोंडावर असल्याने येता पंधरवड्यात जनतेने सावधानता बाळगावी झाडे झुडपे यांच्याजवळ उभे राहू नये, पडके घरे वा भिंत या पासून थोडी सावधगिरी बाळगावी असे आवाहनही आमदार सोनवणे यांनी केले.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, विकास पाटील हरीष पवार ,माजी उपनगराध्यक्ष मेहमूद बागवान, फरमान मिस्तरी, इरफान मिस्तरी ,मजहर सय्यद, इम्रान खाटीक, मोईन कुरेशी, श्री बारी आदी उपस्थित होते.
घटना स्थळाचा पंचनामा
सदरील घटनास्थळाचा पंचनामा प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आला असून शासकीय जीआर नुसार योग्य ते अनुदानासाठी प्रस्ताव आमच्याकडून तयार करण्यात येणार असल्याची माहिती
नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी दिली.मंडळ अधिकारी मनोज साळुंखे, तलाठी पवन पवार, कोतवाल जितेंद्र धनगर आदी उपस्थित होते.